Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

लैंगिकतेच्या प्रश्नाकडे तटस्थपणे पहावे – डॉ.नंदिनी देव

पुणे: समाजात आपण लैंगिकतेचा जितका निरपेक्ष पद्धतीने अभ्यास करू तितके यातील नवीन दृष्टिकोन आपल्याला कळत जातील, त्यामुळे लैंगिकतेच्या प्रश्नांकडे कोणत्याही ठोकताळ्यातून किंवा पूर्वग्रह दृष्टिकोनातून न पाहता अधिक कल्पकतेने आणि सर्जनशिलपणे पाहणे गरजचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ.नंदिनी देव यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धर्म, लोकशाही आणि लोकवादात लैंगिकतेचे स्थान? ‘ या विषयावर डॉ.देव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतातील माजी राजदूत डॉ.गौतम बंबावले, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ.देव म्हणाल्या, धर्म आणि स्त्रिया यांच्यातील प्रवास केवळ एकाच मार्गाने झाला असे म्हणता येणार नाही. धर्माने स्त्रियांवर अत्याचारच केले असे नाही तर स्वतःची ओळख निर्माण होण्यासाठी स्त्रियांना धर्माची मदत झाली.

स्त्रियांचा लोकशाहीच्या अंगाने अभ्यास करता त्यांच्या सध्याच्या संशोधनात डॉ.देव लैंगिकता, समाजाला जोडणारी मूल्ये आणि स्वतःची ओळख यासारख्या पैलूंचा सहायाने धर्म, लोकशाही आणि लोकवाद यांच्या अभ्यास करत आहेत. त्यांनी त्यांच्या पावित्र्याचा, शरीराचा आणि कौटुंबिक असण्याचा उपयोग स्वतःसाठी केला. तर कोरोनासारख्या महासंकटात अत्यंत सर्जनशील आणि चिकाटीने काम करण्यात त्यांचे कसब दिसून आले. त्यामुळेच स्त्रीवाद आणि पुरुषत्व या चष्म्याने या सर्व गोष्टींकडे न पाहत या लिंगभावाचा समाज अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून कसा अभ्यास करता येईल हे आपण पाहायला हवे असेही डॉ.देव म्हणाल्या.

गौतम बांबावले म्हणाले, सध्या भारत सरकारकडून सर्व आर्थिक नियोजनात स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवत आहे.

डॉ. विजय खरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिली. तसेच विभागात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading