fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवावर पंडित जसराज यांची मनापासून निष्ठा होती – दुर्गा जसराज  

पुणे :“ भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे आणि संगीतमार्तंड पं. पंडित जसराज यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. तानसेन यांच्यानंतर भारतीय शास्रीय संगीतावर जर कोणाचा दीर्घकाळ प्रभाव राहिला असेल तर तो निश्चितच पंडितजींचा आहे, असे वडील नेहमी म्हणत. सवाई गंधर्व महोत्सावाबाबतदेखील त्यांना अतिशय आपुलकी होती. या महोत्सवात सादरीकरणासाठी तब्बल महिनाभर आधीपासूनच त्यांची तयारी असायची. महोत्सवावर त्यांची मानापासून निष्ठा होती. इतकेच नव्हे, तर पंडितजींच्या निधनानंतर या महोत्सावाप्रती आपली जबाबदारी अधिक वाढली असे ते मानत असल्याचे  पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी सांगितले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवांतर्गत आयोजित अंतरंग..एक अनोखी रसयात्रा या कार्यक्रमात त्या बोलत होते. कार्यक्रमात दुर्गा जसराज आणि पं. जसराज त्यांचे भाचे व शिष्य पं. रतन मोहन शर्मा हे पं. जसराज यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र व गायक श्रीनिवास जोशी यांनी या दोघांशी संवाद साधला.  याप्रसंगी पं. जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे, पं. रतन मोहन शर्मा यांचे पुत्र व गायक स्वर शर्मा उपस्थित होते.

दुर्गा जसराज म्हणाल्या, “ पंडितजीसोबत प्रत्येकाचे वेगळे आणि आपुलकीचे नाते होते. इतर वेळी त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ असत. पण संगीताबाबत गडबड त्यांना आवडत नसत. त्यांच्या शिकवणीचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या शिष्यांना कधीच स्वतः च्या सुरानुसार शिकण्याचा आग्रह करत नसत. तर शिष्यांच्या सुरानुसार शिकवण्यावर त्यांचा अधिक भर असत. ’’

पंडित जसराज आणि चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या आठवणीबाबत दुर्गा म्हणाल्या, “ पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा या व्ही. शांताराम यांच्या कन्या आहेत. पंडित जसराज आणि त्यांचे सासरे व्ही. शांताराम यांच्याबाबतचे दोन अतिशय प्रेरणादायी किस्से आहेत. माझे आई -वडील जेव्हा कोलकत्त्यात राहत होते व त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यावेळी एकदा व्ही. शांताराम घरी आले आणि माझ्या वडिलांना म्हणाले, की तुला सध्या काम मिळत नाही तर तू वसंत देसाई यांच्या सोबत बस आणि तुम्ही एका चित्रपटासाठी संगीत द्या.’’ त्यावेळी वडिलांनी अतिशय नम्रपणे ही संधी नाकारली. संगीताप्रती पं. जसराज यांची निष्ठा पाहून आजोबांनी त्यांना तू खूप मोठा होशील असा आशीर्वाद दिला होता.  पुढे  पं. जसराज यांना एकदा मुंबईत एक मोठा कार्यक्रमासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी व्ही शांताराम यांना कार्यक्रमासाठी घेऊन यावे अशी अट आयोजकांनी त्यांना टाकली. माझे वडील व्ही शांताराम यांना भेटले आणि या अटीबाबत सांगितले त्यावेळी आजोबा व्ही शांताराम म्हणाले, “ मी या कार्यक्रमाला येणार नाही कारण,  व्ही शांताराम यांच्यामुळे पं जसराज मोठे झाले हे ऐकलेले मला कधीही आवडणार नाही. ज्यावेळी केवळ तुझ्यासाठी कार्यक्रम होईल. त्यावेळी मी आवर्जून कार्यक्रमासाठी येईल आणि अगदी शेवटच्या रांगेतही बसेन.’’

कार्यक्रमात रतन मोहन शर्मा यांनी पं. जसराज यांच्यासोबतच्या संगीत शिक्षण विषयक आठवणीना उजाळा दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading