fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

औरंगाबाद : विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश


मुंबई – औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री येथे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परिवारात स्वागत केले.

यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख डॉ विनोद घोसाळकर उपस्थित होते.

यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, ऍड प्रतापराव पाटील निंबाळकर, (तालुका अध्यक्ष पंचायत समिती), प्रतापराव पाटील धोर्डे, सभापती, कृ. उ.बा.स.यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पैठणमध्ये भाजपला खिंडार
भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भाजपला धक्का देत शिवबंधन हाती घेतले.

गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत हजारो कार्यकर्त्यांचा संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.

आज शिवबंधन हाती घेतलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व गद्दारांना येत्या निवडणुकीत घरी बसवणार असल्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading