fbpx

बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला  टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिपत्तीचा मानांकीत खेळाडूवर विजय  

सोलापूर :  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओअॅसिस, प्रिसीजन, जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या बिगर मानांकीत श्रीवल्ली रश्मिका भामिदिपत्तीने स्पेनच्या दुस-या मानांकीत  इव्होन कॅव्हेल-रीमर्स हिला पराभवाचा धक्का देत दुस-या फेरीत प्रवेश केला.
 
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून प्रवेश मिळवलेल्या भारताच्या बिगर मानांकीत श्रीवल्ली रश्मिका भामिदिपत्तीने स्पेनच्या दुस-या मानांकीत  इव्होन कॅव्हेल-रीमर्स हिचा 1 तास 58 मिनिट चाललेल्या रोमहर्षक सामन्यात  5-7, 6-3, 6-2 असा पराभव करत दुस-या फेरीत धडक मारली. थायलँडच्या बिगर मानांकीत मनाचाया सावंगकाव हिने युक्रेनच्या पाचव्या मानांकीत व्हॅलेरिया स्ट्राखोवा हिचा 3 तास, 1 मिनिट चालेल्या संघर्षपुर्ण लढतीत  6-3, 5-7, 7-5  असा पराभव केला.
भारताच्या अव्वल मानांकीत अंकिता रैनाने थायलँडच्या  लानलाना तररुडी हिचा 7-5, 6-2 असा तर रुतुजा भोसलेने नेदरलँडच्या लेक्सी स्टीव्हन्सचा 6-2, 6-2 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. सोजन्या बाविसेट्टीने साऊथ कोरियाच्या जिओ जंग हीचा 6-0, 6-1 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-(मुख्य ड्रॉ) एकेरी गट- पहिली फेरी
अंकिता रैना (भारत)[1] वि.वि लानलाना तररुडी ( थायलँड  ) 7-5, 6-2
श्रीवल्ली रश्मिका भामिदिपत्ती (भारत)  वि.वि   इव्होन कॅव्हेल-रीमर्स (स्पेन)[2]  5-7, 6-3, 6-2 
अनास्तासिया कुलिकोवा (फिनलँड )[3] वि.वि वैदेही चौधरी(भारत) 6-0, 6-1
मनाचाया सावंगकाव (थायलँड) वि.वि व्हॅलेरिया स्ट्राखोवा(युक्रेन)(5) 6-3, 5-7, 7-5 
कतरिना कोझारोव (सर्बिया)वि.वि कोनी पेरिन ( स्वित्झरलँड )[7] 7-5 (सामना सोडून दिला)
प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो( इंडोनेशिया) [8] वि.वि   इनेस मुर्ता( पोर्तूगाल) 6-4, 6-0
रुतुजा भोसले (भारत) वि.वि लेक्सी स्टीव्हन्स (नेदरलँड) 6-2, 6-2
केसेनिया लास्कुटोव्हा (रशिया) वि.वि व्हिक्टोरिया मोर्वायोवा(स्लोव्हाकिया) 6-2, 6-1
सोजन्या बाविसेट्टी (भारत)  वि.वि  जिओ जंग(साऊथ कोरिया) 6-0, 6-1
एलेना जमशीदी (डेनमार्क) 
 वि.वि  वासंती शिंदे (भारत) 2-6, 7-5, 7-6(9)

Leave a Reply

%d bloggers like this: