fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsPUNE

पीएमपीएमएलची अभि-एअरपोर्ट बससेवा आता नियमित तिकीटदरात

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत अभि (ABHI-Airport Bus for Business and Hotel Interconnectivity)
एअरपोर्ट बससेवा पुणे (लोहगांव) विमानतळावरून ६ विविध मार्गांवर स्मार्ट एसी ई बस द्वारे दिली जाते. अभि एअरपोर्ट बससेवेचे मार्ग
हे बिझनेस व हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी च्या दृष्टीकोनातून तयार केलेले असल्याने या बससेवेसाठी विशेष तिकीटदर आकारण्यात येत होते.
मात्र एअरपोर्ट बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद कमी असून त्याचा परिणाम परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे.
अभि एअरपोर्ट बससेवेची प्रवाशी संख्या व उत्पन्न वाढीच्या दृष्टीने परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी सध्या प्रचलित असलेल्या तिकीट दरामध्ये फेर रचना करून सर्वसाधारण बसेसचे तिकीट दरानुसार
दि. १६ डिसेंबर २०२२ पासून प्रायोगिक तत्वावर अभि बससेवेच्या ६ मार्गांवर तिकीट दर आकारणी करण्यास आदेशित केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: