fbpx

ही झुंडशाही चालणार नाही.. – चंद्रकांत पाटील 

पिंपरी : एक गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत पोचल्याचे सरंजामशाही लोकांना रुचलेले नाही. त्यामुळे असे भ्याड हल्ले होत आहेत. मी चळवळीतील कार्यकर्ता असून कोणालाही घाबरणार नाही. भारतात लोकशाही आहे. ही झुंडशाही चालणार नाही, हिम्मत असेल तर समोर या, अशा शब्दात टिकाकारांना चंद्रकांत पाटील उत्तर दिले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, काल पैठण येथे संत विद्यापीठाच्या कार्यक्रमात मी वक्तव्य केल्यानंतर रीतसर आपली बाजू मांडली आहे. इतकेच नव्हे तर मी त्या वक्तव्या विषयी दिलगिरीही व्यक्त केली आहे. तरीसुद्धा काही लोक पराचा कावळा करीत आहेत. आज हल्ला झाला तेव्हा आमचे कार्यकर्तेही होते पण आम्ही त्यांना आवरलं. भारतात लोकशाही आहे. ही झुंडशाही चालणार नाही, हिम्मत असेल तर समोर या.

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: