Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

पिंपरी : कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. आज या वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर संध्याकाळच्या सुमारास शाईफेक करण्यात आली आहे. अचानक झालेल्या शाईफेक आणि घोषणाबाजीमुळे गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील हे आज पिंपरी येथे नियोजित कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी एका कार्यकर्त्यांच्या घरातून बाहेर पडत असताना चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर एका व्यक्तीने कालच्या विधानाच्या निषेधार्थ शाईफेक केली. यावेळी पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शाईफेक झाल्यानंतरही चंद्रकांत पाटील हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading