fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

गणपती बाप्पा, चंद्रकांत पाटलांना बुध्दी दे! : आप

पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी काल औरंगाबाद येथे वादग्रस्त विधान केले आहे. ‘फुले, आंबेडकर आणि कर्मवीर पाटील यांनी शाळेसाठी भीक मागितली. शाळांनी अनुदान नव्हे तर सीएसआर फंड मिळवावेत’ असे विधान त्यांनी केले आहे. या विधानाच्या निषेधार्थ आणि भाजपला इशारा म्हणून आम आदमी पार्टी तर्फे कोथरूड येथील कर्वे पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. त्यावेळेस ‘भीक नको शिक्षण हक्क हवा’, ‘गणपती बाप्पा, चंद्रकांत पाटील यांना अक्कल दे!’ ‘चंद्रकांत पाटील हाय हाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

महात्मा फुले, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा शाळेत प्रवेश घेऊन इतिहासाचा अभ्यास करावा आणि हे लक्षात घ्यावे की महात्मा फुलेंनी इंग्रजांकडे, हंटर आयोगाकडे मोफत, सक्तीचा शिक्षण हक्क प्रस्ताव मांडला होता, डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या मार्गाने हा शिक्षणाचा हक्क बहुजनांना मिळवून दिला आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करून बहुजनांना संधी उपलब्ध करून दिली. असे असताना त्यांच्या रचनात्मक कामा संदर्भातले हे विधान अत्यंत निषेधार्थ आहे, असे आप चे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी म्हंटले.

मोठ्या कंपन्यांना हजारो कोटी च्या सवलती देणाऱ्या सरकारला अनुदानासाठी ची जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही हे धोरण गरिबाला शिक्षणापासून वंचित ठेवेल. त्यामुळे आता हा सर्व समाजाला शिक्षण हक्क प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आता ‘ सी एस आर ‘ची भीक नको आणि यापुढे चंद्रकांत यांनी अशी विधाने करू नयेत अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल असा इशारा आप तर्फे देण्यात आला.

आज च्या आंदोलनात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी एकनाथ ढोले, नीलेश वांजळे,अभिजीत वाघमारे , आदित्य जाधव, ऋषिकेश मारणे, फेबियन सॅमसन, मनोज चोरडिया, आरती करंजावणे, सीमा गुट्टे, वैशाली डोंगरे, श्रद्धा शेट्टी, सुजित आगरवाल,मनोज शेट्टी, माधुरी गायकवाड , उमेश शेट्टी, अमोल मोरे, सुरेखाताई भोसले, कीर्तीसिंग चौधरी, अविनाश भाकरे, किशोर मुजुमदार, उमेश बागडे, श्रीकांत चांदणे, नितीन पायगुडे, विक्रम गायकवाड, मिलिंद सरोदे, थोरात मनोज, चंद्रकांत गायकवाड, गजानन भोसले, सय्यद अली, सुहास पवार, निखिल कंद, शिवाजी डोलारे, संदेश सोलेकर, प्रथमेश भोसले, विवेक गोसावी, तुषार कासार, फैजान शेख, किशोर मस्के,तात्यासाहेब आवटे, जयश्री डिंबळे, दिनेश वर्मा, किरण इंगळे, निखिल कंद सामील झाले होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading