fbpx

ऑलिम्पिकच्या धर्तीवर ‘स्पोर्टस फॉर ऑल’ क्रीडास्पर्धा ११ डिसेंबर पासून पुण्यात

पुणे : सर्वांसाठी क्रीडाक्षेत्र खुले असावे, अशा हेतूने व क्रीडाक्षेत्राचा तळागाळापासून प्रचार व प्रसार करण्यासाठी स्पोर्टस फॉर ऑल या भारतातील पहिल्या डिजिटल व मैदानावर काम करणाऱ्या संस्थेतर्फे पुण्यात येत्या ११ ते १७ डिसेंबर २०२२ दरम्यान स्पोर्ट्स फॉर ऑल क्रीडास्पर्धेच्या पहिल्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
 
अशा प्रकारच्या या पहिल्याच क्रीडास्पर्धेत पुण्यातील ८२००स्पर्धकांसह ५०० शाळांचा सहभाग नोंदवला असून एकूण ३ लाख रुपये पारितोषिक रक्कम ठेवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबरच प्रशिक्षकांसाठीही आखण्यात आलेल्या खास योजनेनुसार एकूण १२ लाख रुपयांच्या शिष्यवृत्त्या देण्यात येणार आहेत. एकूण सात दिवस रंगणारी ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडासंकुल बालेवाडी, विमाननगर स्केटिंग रिंक, डेक्कन जिमखाना क्लब, टिळक जलतरण तलाव- डेक्कन जिमखाना आणि स्पायसर अॅडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी अशा पाच ठिकाणी होणार असून त्यात विविध क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. 
 
स्पोर्टस फॉर ऑल संस्थेच्या मुख्य विपणन अधिकारी समेरा खान म्हणाल्या, की स्पोर्टस फॉर ऑलच्या माध्यमातून तळागाळापासून अधिकाधिक बालकांमध्ये क्रीडाक्षेत्राबद्दल रस निर्माण करणे आणि त्यांना क्रीडाक्षेत्रात सहभागाची सधी देणे हे आमचे लक्ष्य आहे. बालकांमधील सुप्त क्रीडागुणांना ओळख मिळावी आणि त्यांना विकासाची संधी मिळावी, हेच स्पोर्ट्स फॉर ऑल क्रीडास्पर्धेचे ध्येय आहे यातील अनेक शाळांमध्ये आमच्या दष्टीशी मिळते वातावरण असून या शाळा दर्जेदार शैक्षणिक सुविधांबरोबरच उत्तम दर्जाच्या  क्रीडासुविधांकडे आणि बालकांमध्ये क्रीडागुण विकसित करण्याकडे लक्ष देतात. स्पोर्टस फॉर ऑल स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही आम्हीला असंख्य शाळांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही स्पर्धा प्रचंड यशस्वी होण्याचा आम्हाला विश्वास वाटतो.
 
मुंबई, हैदराबाद आणि डेहराडून येथे ही स्पर्धा २०१५ पासून आयोजित करण्यात येते. या ठिकाणी पार पडलेल्या स्पोट्र्स फॉर ऑल स्पर्धांच्या १० सत्रांमध्ये तीन हजार शाळांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 

Leave a Reply

%d bloggers like this: