fbpx

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ पुणे युवक काँग्रेसकडून सह्यांची मोहीम

पुणे: कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून अखंड महाराष्ट्र राज्यात ज्यांच्या नावाचा ठसा उमटवला आहे असे आपल्या सर्वांचे परिचित असणारे तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ व काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील आलका चौकात सह्यांची मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेस ही मैदानात उतरली आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरून पुन्हा बदली करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. हे दुर्दैव म्हणावे लागेल. स्पटेंबर 2022 मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा आतोनात प्रयत्न होता.

मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आतच मुंडे यांचा कार्यभार काढला गेला आहे. हे चाललाय काय? 16 वर्षात 19 वेळा तुकाराम मुंडे यांची बदली केली गेली आहे. एखाद्या अधिकाऱ्याची 16 वर्षात 19 वेळा बदली होते हे का? याचे उत्तर द्यावे. कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांना आरोग्य विभागाचा त्वरीत कारभार देण्यात यावा यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली असून हजारो पुणेकरांनी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ माजी आमदार मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सह्या केल्या असल्याची माहिती काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.तर आमच्या सह्यांच्या मोहिमेचा विचार करून ताबडतोब तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यात यावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक महासचिव प्रथमेश आबनावे पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाट, कोथरूड विधानसभा अध्यक्ष अजित ढोकळे, उपाध्यक्ष अजय राख, उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: