Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नांसाठी देशव्यापी लढा उभारणार : बाबा कांबळे

पुणे:राष्ट्रीय ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून रिक्षा चालक मालकांचे प्रश्न देशव्यापी मांडून मोठा लढा उभारणार आहे. महाराष्ट्रात ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यांच्यामार्फत न्यायासाठी लढणार असल्याचे राष्ट्रीय ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले. बोगस रिक्षा संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींची या समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने देखील ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीशी पत्रव्यवहार करण्याचे आवाहन बाबा कांबळे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केले आहे.

राष्ट्रीय ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन दिल्ली, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

राष्ट्रीय ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, दिल्ली येथून आलेले राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र सोनी, जम्मू काश्मीर मधून आलेले राष्ट्रीय संयोजक जावेद शेख, या वेळी राजेंद्र सोनी (दिल्ली), शेख महंमद जावेद, शेख अहंमद, मोहम्मद युनुस (कस्मिर), महंमद शफी (जम्मू), रामकृष्ण रेड्डी (तेलंगाना), गजानन खापे (कर्नाटक,), हबीब शेख (आंध्रप्रदेश), सुरज पाल (राजस्थान), सुरजीतसिंग राणा (हिमाचल प्रदेश), जोगींदरसिंग (पंजाब), राजवीर शर्मा (उत्तर प्रदेश), नरेंद्र गायकवाड (नांदेड), आनंद चौरे (नागपूर), रवी तेलरांधे (विदर्भ) सह देशभरातील रिक्षा टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्हणाले की, या दोन्ही संघटनेच्या वतीने हा लढा आता देशपापी करण्यात आला आहे. पुण्यात देखील आम्ही १२ तारखेनंतर आंदोलन करणार आहोत. त्याचवेळी देशांमध्ये सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे आंदोलन होणार आहे. या मध्ये दिल्ली, जम्मू-काश्मीर, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आदींसह सर्वच ठिकाणी हे आंदोलन एकाच वेळी उभे केले जाणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. काही रिक्षा संघटना दिशाभूल करत आहेत. त्यांच्याकडे रिक्षा चालकांनी लक्ष देऊ नये. सरकारनेही खरी कृती समिती असणाऱ्या आमच्या समितीशी पत्रव्यवहार करावा. प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा करावी. असे बाबा कांबळे म्हणाले.

राजेंद्र सोनी म्हणाले की, देशातील राजधानी दिल्ली येथे देखील हा टू व्हीलर रॅपिडोचा प्रश्न आम्हाला सतावत आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबद्दल सरकारने कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. सरकारच्या विरोधामध्ये आम्ही लढा सुरू केलेला आहे. प्रश्न न सुटल्यास पुढे हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचे सोनी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading