Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्याबाबत डॉ.नीलम गोऱ्हे यांचे मनपा आयुक्त यांना सूचना…

पुणे: पुणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक नागरिक पुणे शहर हे वास्तव्यासाठी पसंतीक्रमात प्राधान्याने निवडत आहेत. यामुळे शहराच्या नागरी व्यवस्था आणखी मजबूत करण्याची आवश्यकता निर्माण होत आहे.

आज दि.०२ डिसें रोजी पुण्यात पालकमंत्री आणि जिल्ह्यातील, शहरातील लोकप्रतिंनिधींसोबत झालेल्या बैठकीतही या मुद्द्यांवर विशेष चर्चा करण्यात आली. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. या अनुषंगाने पुण्याचा पाणी पुरवठा नियमित आणि पुरेशा प्रमाणात होण्याकडे डॉ.गोऱ्हे यांच्यासह सर्वांनीच लक्ष वेधले आहे.

पुणेकर नागरिकांना पिण्यासाठी, वापरण्यासाठी आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिका स्तरावर प्रभावी नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. पुण्याच्या धरण साखळीत येणारा पाणीसाठा आणि त्याचे केले जाणारे वाटप याबाबत अनेकदा चर्चा झालेल्या आहेत.

यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शहरात नागरिकांना नियमितपणे वितरीत होत असलेल्या पाणी साठयाची गळती कुठे कुठे होते याबाबत शहरात वॉर्ड निहाय अद्ययावत माहिती घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात याव्यात अशी सूचना पुणे मनपा आयुक्त यांना केली. तसेच


◆ नागरिकांनी दैनंदिन जीवनात पाणी वापर करण्यासाठी आदर्श आचारसंहिता तयार करून नागरिकांसाठी वितरीत करण्यात यावी.
◆ शेतीसाठी वितरीत होत असलेल्या कालव्याच्या पाण्याची ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडत असल्याने किंवा अवैध रीत्या पाणी चोरीचे प्रकार होत असल्याने होत असलेली गळती रोखण्यासाठी विशेष उपाय योजना करावी. यासाठी जिल्ह्यातील पाणी वाटप संस्थांना यामध्ये सक्रिय काम करण्याबाबत आदेश देण्यात यावे.

◆ पुणे शहराच्या विस्तारीत भागात मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी अनेकदा बोअरवेलच्या पाण्यातून उपसा करून नागरिकांना आणि व्यवसायिकांना विकत दिले जाते. या टँकरने वाहतूक केल्या जाणार्‍या आणि उपसा होणार्‍या पाण्याबाबत नियमित नोंद करण्यासाठी पुणे महापालिकेने विशेष यंत्रणा उभारावी. जेणेकरून हे पाणी किती प्रमाणात उपसा केला जातो याबाबत निश्चित माहिती मिळणे सुलभ होईल असं देखील डॉ.गोऱ्हे यांनी पुणे मनपा आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading