Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

IFFI 2022 : ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं धक्कादायक – ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड

गोवा : इफ्फी सोहळ्याच्या सांगता समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचे म्हटले आहे. द काश्मीर फाईल्स ही प्रोपगेंडा फिल्म आहे. अशा सिनेमाची इतक्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिवलमध्ये केली गेलेली निवड आम्हा सर्वांना खटकणारी आहे, असेही ते म्हणाले. मात्र यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

गोवा येथे काल (दी. 28) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI 2022) समारोप समारंभात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक प्रमुख मंत्री उपस्थित होते. यावेळी लॅपिड म्हणाले, द कश्मीर फाइल्स या चित्रपटाने आपण सगळेच व्यथित झाले होतो. अशा प्रतिष्ठित महोत्सवाच्या कलात्मक स्पर्धात्मक विभागासाठी हा चित्रपट अयोग्य व अश्लील वाटला. माझ्या या चित्रपटाविषयी असणाऱ्या भावना मी उघडपणे मांडतोय कारण इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात अश्या प्रकारच्या टीका व्हायला हव्यात.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी अभिनीत काश्मीर फाईल्स गेल्या आठवड्यात महोत्सवाच्या “पॅनोरमा” विभागात प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे.


Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading