fbpx
Monday, May 20, 2024
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी सिझन 4 : पहिल्याच दिवशी राखी व अमृतामध्ये जुंपली  

चार नवीन स्पर्धक आता बीग बॉसच्या घरात आहेत. त्यातील विशाल निकम हा बिग बॉस मराठीचा विजेता आहे. तर राखी सावंत हीसुद्धा तिच्या आक्रमक स्वभावामुळे सर्वांना परिचित आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात राखी VS विशाल बघायला मिळणार आहे. अन् या वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी राखी व अमृतामध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे.

अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, तुला झोपायचं नाहीये का ? तुला नृत्य करायचे आहे ? लाईट बंद झाले ना ? अमृता म्हणाली, झोपते आहे कि त्यावर राखी म्हणाली, मग झोप … आणि इथून वाद सुरु झाला. अमृता म्हणाली, मला नाही झोपायचं इतक्यात. त्यावर राखी तिला म्हणाली, माझ्या डोक्यावर का नाचतेस ? अमृता म्हणाली, मी इथे बसून नाचते आहे. राखी म्हणाली, मी रात्री बसते तुझ्या डोक्यावर थांब… इडियट…माझी झोपच गेली. आता सगळे झोपल्यानंतर मी बोलणार… उगीच भांडणं ना? विशाल त्यावर म्हणाला, आता झोपा ना तुम्ही. राखी त्यावर म्हणाली, आता नाही झोपणार माझी झोप गेली…बोलणार मी आता, माझी मर्जी. विशाल म्हणाला, तिला शिकवता आणि तुम्ही काय करताय ? तिला का बोलताय एवढं तोंड वर करून. राखी म्हणाली, मी तेच करते आहे जे ती करत होती. विशाल म्हणाला, गप बसायचं. राखी म्हणाली, तू गप बस…

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सीजन 4.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading