Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यपाल पुन्हा वादात; भगतसिंग कोश्यारींकडून हुतात्म्यांचाही अनादर

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण आधीच तापलेले असताना, आज पुन्हा एकदा राज्यपाल वादात सापडले आहेत. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात  शहीद पोलिस अधिकारी आणि जवानांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली. मात्र राज्यपालांनी श्रद्धांजली वाहताना त्यांची चप्पल काढली नाही. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावत यांनी हा व्हिडिओ ट्विट करून राज्यपालांनी हुतात्म्यांचाही अनादर केल्याचा आरोप केला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading