Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संभाजी ब्रिगेडचा गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा 

सोलापूर : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्यावर काळी पावडर टाकटी. यामुळे एकच गदारोळ झाला.

गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सदावर्तेंच्या मागे जाऊन उभे राहिले. काही वेळातच त्यांनी सदावर्तें विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व त्यांच्या अंगावर काळी पावडर फेकली. सदावर्ते यांच्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे, असा आरोप करत सदावर्ते यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. 

दरम्यान, आज आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असल्याचा गंभीर आरोप सदावर्तेंनी केला आहे. तसेच अशा हल्ल्यांनी मी घाबरत नाही असेही सदावर्ते यांनी सांगितले.   

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading