आपसे ये उमीद ना थी सुप्रिया सुळे यांचा फडणवीस यांना टोला
पुणे :राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातून त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. विविध ठिकाणी आंदोलन पण सुरू आहे. काय देवेंद्र फडणीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत
जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले.तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. असे वक्तव्य केले होते.दिल्लीवरून फडणवीस यांना फोन आला आणि त्यांनी राज्यपाल यांची पाठ राखण केली.फडणवीस आपसे ये उमीद ना थी असे म्हणतराष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणविस यांना टोला लगावला.
पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताची पाहण करण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या.
तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
नवले ब्रिज अपघाताबद्दल बोलताना त्यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटलं आहे. सर्व्हिस रोड झाले नाही, क्रोनिक पॉईंट झाले, उतार आहे. या रस्त्यावर काम करणं महत्त्वाचं आहे. आज पुणे महापालिका आयुक्त सगळे टीम यासंदर्भात बैठक घेणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मी केंद्र आणि राज्य सरकारांना विनंती केली आहे की श्रद्धाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे. जेणेकरून भारतातील महिलांना योग्य न्याय मिळू शकेल. असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
भाषण नीट ऐका, थोडा वेळ पाहून ऐका त्यात मी काय म्हटलं. टीका करण्याचा अधिकार सर्वांना असून ते करत आहेत. पण निंदकाचे घर हे शेजारी असावे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला.
‘इतिहास हा खरा मांडला पाहिजे सिनेमा वेगळा अन् खरं वेगळं असतं.इतिहास आणि काल्पनिक वेगळं,ट्विट बाबत याचा इतिहास असेल म्हणून त्यानी असं ट्विट केलं मला त्यांचं ट्विट नीट पाहयला हवं ते पाहुन मी बोलेल. पण सावरकर यांच्या दोन बाजू आहेत. सावरकरांबद्दल दोन टोकाच्या भूमिका आहेत, असंही सुळे म्हणाल्या.
