सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीतर्फे आंतरराष्ट्रीय एचआर कॉन्क्लेव्हचे यशस्वीरित्या आयोजन
पुणे : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू), तर्फे राष्ट्रीय एचआरडी नेटवर्क, पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी किवळे येथील विद्यापीठाच्या परिसरात ‘रीबूटिंग द स्किल्स रिव्होल्यूशन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय एचआर-कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्य मानव संसाधन अधिकाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये ‘सिम-रत्न’ आणि ‘सिम-ऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ह्या कार्यक्रमासाठी एक्सेंचर ( Accenture ) टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत सारडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .एसएसपीयूचे कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळेस हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचे लोक अधिकारी डॉ. विश्वनाथ जोशी, यांनी लर्निंग टू लर्न या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कौशल्य विद्यापीठाच्या उद्दिष्टांविषयी बोलताना एसएसपीयूच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, कौशल्य विद्यापीठ हा शैक्षणिक क्षेत्रातील नवा प्रयोग असून ,आम्ही ७० टक्के प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देतो . अलीकडेच, अटल इनोव्हेशन मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी विद्यापीठाच्या इन्क्युबेशन गटाला भेट दिली हा इन्क्युबेशन गट लवकरच स्टार्टअप सुरु करत आहे. नागरिकांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आम्ही अटल इनक्युबेशन कम्युनिटी सेंटर (AICC) स्थापन करण्याबाबतही चर्चा केली आहे . सिंबायोसिसचे माजी विद्यार्थी यशाचे नवं नवीन शिखरे गाठत आहेत आज सिंबायोसिसचे माजी विद्यार्थी असलेल्या विविध कंपन्यांमधील मुख्य मानव संसाधन अधिकाऱ्यांना सिम-रत्न देताना आम्हाला खूप आनंद होत आहे .
एनएचआरडी नेटवर्क पुणे चॅप्टरचे ,अध्यक्ष,श्री. अमन राजबली म्हणाले की एसएसपीयु सोबत सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे . शिक्षण क्षेत्रातील आदर्श असलेले डॉ . एस.बी. मुजुमदार सर यांनी राष्ट्रीय मनुष्यबळ विकास नेटवर्कच्या कार्याचे कौतुक केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. एनएचआरडी कौशल्य निर्माण, नेटवर्किंग आणि ज्ञानाचा प्रसार यावर भर देते ” एसएसपीयूमध्ये मिळणाऱ्या कौशल्य आधारित शिक्षणाचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले
त्यांच्या स्वागत संभाषणावर डॉ. एस.बी. मुजुमदार म्हणाले की एसएसपीयू बरोबर एनएचआरडीच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. भारतात १००० विद्यापीठे, ५० हजार महाविद्यालये आणि ३ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. एसएसपीयु हे कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे अशा प्रकारचे पहिलेच विद्यापीठ आहे. बेरोजगारी ही भारताची गंभीर समस्या आहे, उद्योग आणि विद्यापीठांनी एकत्रित येऊन विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी काम केले पाहिजे .
डॉ.एस.बी. मुजुमदार यांनी प्रमुख पाहुणे श्रीकांत सारडा यांचा सत्कार केला. आपल्या भाषणात सारडा म्हणाले की , “आपण अपयश साजरे केले पाहिजे .आजकालची पिढी ही अपयशांमधून शिकण्याचा प्रयत्न करते .अपयशांमधून शिकणे हे एक कौशल्य आहे ज्यातून इनोव्हेशनला चालना मिळते आपल्या संस्थेतील या संस्कृतीला आपण प्रोत्साहन देण्यासाठी संघटनेतील नेतृत्त्वाने ठराविक बदल करणे गरजेचे आहे .
कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मानव संसाधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिंबायोसिसच्या १४ माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी सिम-रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भविष्यात देशासाठी कुशल आणि नाविन्यपूर्ण कर्मचारी निर्माण करण्यासाठी आंतरविद्याशाखीय कौशल्य आणि नवकल्पना ( इंटरडिसिप्लिनरी स्किलिंग अँड इनोव्हेशन ) यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल विविध संस्थांच्या मानव संसाधन अधिकाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सिम-ऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, उद्योगांमधील विविध नऊ विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . यात खालील दिलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली
१. रीबूटिंग स्किल्स – रीबूटिंग स्किल्स – अँड्यापटींग टू द डेटा अँड टेक्नॉलॉजिकल रेवाल्युशन इन फायनान्स इंडस्ट्री ( Rebooting Skills – Rebooting Skills – Adapting to the Data & Technological Revolution in Finance Industry)
२. रिबूटिंग स्किल्स – ऑप्टीमायझिंग ह्युमन कॅपिटल इन एससीएम ४. ० ( Rebooting Skills – Optimising Human Capital in SCM 4.0)
३. रीबूटिंग स्किल्स इन द इरा ऑफ न्यू डिजिटल रेगिमी ( Rebooting Skills in the Era of New Digital Regime)
४. रीबूटिंग स्किल्स – बॅंलान्सिंग डिझाईन अँड सस्टेनेबिलिटी ( Rebooting Skills – Balancing Design and Sustainability)
५. रीबूटिंग स्किल्स – रिलायनमेंट टू द न्यू नॉर्मल फॉर इनहांसड सिक्युरिटी ( Rebooting Skills – Realignment to the new normal for enhanced security)
६. रीबूटिंग स्किल्स – ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग ( Rebooting Skills – Green Manufacturing )
७. रीबूटिंग स्किल्स – इंटेलिजेंट मॅन्युफॅक्चरिंग ( Rebooting Skills –Intelligent manufacturing )
८. रीबूटिंग स्किल्स – अलायनिंग वनसेल्फ इन द एज ऑफ ई – कॉमर्स अँड रिटेल ( Rebooting Skills – Aligning oneself in the age of e-Commerce and retail )
९.रीबूटिंग स्किल्स फॉर प्रमोटिंग सस्टेनेबल लाईफस्टाईल चॉईस ( Rebooting Skills for Promoting Sustainable Lifestyle Choice)
पॅनल चर्चेतील माहिती ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण होती
