Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सत्तेवर आलेल्या शिंदे व फडणवीस सरकारने राज्याचं वाटोळं केलं – करुणा मुंडे

पुणे:राज्यात सध्या एक वर्षापासून घाणेरडे राजकारण सुरू आहे त्यामुळे काही सामाजिक संस्था व विविध नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.राज्यात आज जे राजकारण सुरू आहे ते खरच थक्क करणारं आहे. मुख्य मुद्दे सोडून आपली खुर्ची वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. जनतेची कुणीच मदत करत नाही. दुसरे तीन पक्ष एकत्र येवून राज्याचं वाटोळं करत असल्याची टीका धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुण मुंडे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, सगळे मंत्री आपली खुर्ची वाचवायला लागले आहेत. आम्ही राज्यातल्या सगळ्या संघटना एकत्र करून येणाऱ्या सगळ्या निवडणुका एकत्र लढणार आहोत. आम्ही गरीब जनेसाठी लढू, आम्ही घराणेशाही आणि हुकूमशाहीच्या विरोधात लढा देणार आहोत. रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना, शिवशक्ती सेना, सी आर सामाजिक संघटना या तिन्ही संघटना पुण्यात एक नवीन आघाडी स्थापन करणार आहोत. या आघाडीसाठी ३० ते ४० संघटना यामध्ये सामील होणार असंही त्या म्हणाल्या.

मुंडे यांनीकाँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. राहुल गांधींकडे कुठलाही अजेंडा नसल्याचे म्हटले. त्यासोबतच, आपण सध्या राज्यात सुरू असलेल्या सावरकर वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरुन, भाजपसह शिंदे गट आणि मनसेही आक्रमक झाली आहे. यासंदर्भात बोलताना करुणा मुंडेंनी म्हटले की, मला त्याबाबत काहीही विधान करायचं नाही. कारण, देशात, राज्यात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, नोकरी, महागडे शिक्षण, महिलांवरील अन्याय-अत्याचार यासह विविध प्रश्न आहेत. त्यामुळे, गाढलेल्या मुदड्यांवर मला राजकारण करायचं नाही, असे स्पष्टपणे करुणा मुंडेंनी म्हटले. या वादावर मला काहीही विधान करायचं नाही.असेही त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading