केअर हेल्थ इन्शुरन्सने सादर केले त्यांचे सर्वोच्च उत्पादन – केअर सुप्रीम
नवी दिल्ली: भारतातील आघाडीच्या आरोग्य विमा तज्ञांपैकी एक केअर हेल्थ इन्शुरन्सने ‘केअर सुप्रीम’ या सर्वसमावेशक आरोग्य विमा उत्पादनाचे अनावरण केले असून तुम्हाला तुमच्या आरोग्य संरक्षणामधून मिळणारे मूल्य पुन्हा परिभाषित करण्यासाठी ते आहे. वैद्यकीय आणीबाणीमुळे भविष्यात विमाधारकाला सामोरे जावे लागणाऱ्या संभाव्य अनपेक्षित परिस्थितीच्या अनुषंगाने हे उत्पादन तयार केले आहे.
‘केअर सुप्रीम’ विमाधारकांना स्वतःच्या आवडीचे जीवन जगण्याचे आणि चिंतामुक्त राहण्याचे स्वातंत्र्य देते. या योजनेंतर्गत विमाधारकाला जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ घेता येऊ शकेल. एकत्रित बोनस सुपरमध्ये विम्याच्या रकमेत ५००% पर्यंत वाढ, पूर्वी उपचार केलेल्या किंवा नवीन आजारासाठी एकाधिक हॉस्पिटलायझेशनचा खर्च सुरक्षित करण्यासाठी विम्याच्या रकमेचे अमर्यादित ऑटोमॅटीक रिचार्ज, आयुष किंवा प्रगत उपचार जसे की रोबोटिक शस्त्रक्रिया आणि अवयव दाता उपचार यावर कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय ही विमा योजना ऑनलाइन फिटनेस आणि वेलनेस आणि न्यूट्रिशनिस्ट सत्रांमध्ये अमर्याद सेवा देऊन तुमची तंदुरुस्ती देखील सुनिश्चित करते.
या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाच्या सादरीकरणा प्रसंगी बोलताना, केअर हेल्थ इन्शुरन्सचे रिटेल विभागाचे संचालक आणि प्रमुख अजय शहा म्हणाले, “सदैव विकसित होत असलेल्या आरोग्य सेवा तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय खर्चात सतत वाढ होत आहे आणि कोणत्याही अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणीपासून स्वतःचे संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. केअर सुप्रीम विमाधारकाला केवळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करत नाही तर आवश्यक असल्यास, त्यांना सर्वोत्तम उपलब्ध उपचार, त्यांच्या विम्याच्या रकमेचा/कव्हरेजचा जास्तीत जास्त लाभ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वोच्च बक्षिसे मिळतील याचीही खात्री करते. एखाद्याला आपल्या आरोग्य विम्यामधून हव्या त्या सगळ्या गोष्टी, मूल्य पुन्हा परिभाषित करणारे सर्वार्थाने योग्य असे हे उत्पादन आहे.”
शिवाय, विमा योजना आपल्या ग्राहकांना नूतनीकरण प्रीमियमवर ३०% पर्यंत सवलत आणि ते राहत असलेल्या शहरानुसार प्रीमियम भरण्याचा पर्याय देखील देते. यामागील उद्देश केवळ एखाद्याला त्याचे फिटनेस उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करणे एवढाच नसून त्यासाठी त्यांना बक्षीस देणे हाही आहे.
