बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस छगन भुजबळ यांच्याकडून विनम्र अभिवादन
नाशिक :- हिंदूहदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील भुजबळ फार्म येथील कार्यालयात स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रा.डॉ.बाळासाहेब पिंगळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, समता परिषदेच्या शहराध्यक्ष कविता कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार, बाळासाहेब गीते, शंकर मोकळ, अमोल नाईक, सागर मोटकरी, प्रा.ज्ञानेश्वर महाजन, पप्पू शिंदे, संतोष भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
