Friday, May 29, 2026
Latest NewsSports

थर्ड आय स्पोर्ट्स, निंबाळकर वॉरीयर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत !!

पुणे  स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसर्‍या ‘स्पोर्ट्सफिल्ड विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत थर्ड आय स्पोर्ट्स आणि निंबाळकर वॉरीयर्स यांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी मैदान, मुकूंदनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत राहूल कुशवाह याच्या ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर थर्ड आय स्पोर्ट्स संघाने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक संघाचा ९४ धावांनी सहज पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना थर्ड आय स्पोर्ट्स संघाने २० षटकात ८ गडी गमावून १६८ धावांचे आव्हान उभे केलेे. राहूल कुशवाह याने ५६ धावा तर, शंतनु कांबळे याने ४१ धावा केल्या. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ७१ चेंडूत ९७ धावांची भागिदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या आव्हानाला उत्तर देताना स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा डाव ७४ धावांवर गडगडला.

अविराज गावडे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर निंबाळकर वॉरीयर्स संघाने युनिक स्पोर्ट्स क्लबचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना युनिक स्पोर्ट्स क्लबला २० षटकात ११३ धावा धावफलकावर लावता आल्या. सुदेश भोकरे (३३ धावा) आणि संतोष पाटोळे (२२ धावा) यांच्या फलंदाजीनंतर संघाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. अविराज गावडे याने १५ धावात ४ गडी बाद करत अचूक गोलंदाजी केली. निंबाळकर वॉरीयर्स संघाने हे आव्हान ९.३ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. सुरज शिंदे (३१ धावा) आणि अनुराग कावडे (३० धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
थर्ड आय स्पोर्ट्सः २० षटकात ८ गडी बाद १६८ धावा (राहूल कुशवाह ५६ (५२, ५ चौकार, १ षटकार), शंतनु कांबळे ४१, लक्क्ष सिंग २-२६, वेदांत पाटील २-२९);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी राहूल आणि शंतनु ९७ (७१) वि.वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकः १४.४ षटकात ९ गडी बाद ७४ धावा (काशिनाथ प्याती नाबाद २२, सागर सांगळे २०, वेरूण चादूरी ३-०, प्रतिक देहूकर २-९); सामनावीरः राहूल कुशवाह;

युनिक स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ७ गडी बाद ११३ धावा (सुदेश भोकरे ३३, संतोष पाटोळे २२, अविराज गावडे ४-१५) पराभूत वि. निंबाळकर वॉरीयर्सः ९.३ षटकात ४ गडी बाद ११५ धावा (सुरज शिंदे ३१, अनुराग कावडे ३०, गौरव खैरे १७, लखन कुमार २-४०); सामनावीरः अविराज गावडे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading