Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे: पूजा कातुर्डे

झी मराठी वाहिनीवर ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका ७ नोव्हेंबर रात्री  ८ वा. प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ह्या मालिकेत अभिनेत्री पूजा कातुर्डे आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  पूजा कातुर्डे ने मालिका, वेब सिरीज आणि नाटकांमध्ये काम केले आहे, आणि झी मराठी बरोबर ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना पूजा म्हणाली की, ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका एक संगीतमय प्रेम कथा आहे त्यात वीणा ही अतिशय साधी मुलगी आहे आणि ती तिच्या बाबांची खूब लाडकी आहे. वीणा लहानपणापासून आईच्या प्रेमाला मुकलेय त्यामुळे बाबाच तिच्यासाठी सर्वस्व आहेत. वीणाचे वडील कीर्तनकार आहेत, तिला कीर्तनाची आवड आहे, कौटुंबिक संबंध मजबूत आणि एकजूट ठेवणे हे तिचे ध्येय आहे. या मालिकेत  वीणा आणि प्रभास ते दोघेही त्यांच्या स्वभावात, जीवनशैलीत वेगळे ध्रुव आहेत, पण संगीत हा त्यांच्यातील एकमेव समान धागा आहे. वीणा कीर्तनकार आहे तर प्रभास रॉक बँड परफॉर्मर आहे. ते दोघेही संगीतासाठी वचनबद्ध आहेत. हे पात्र साकारण्यात मला खूप मज्जा येतेय आणि हि मालिका माझ्यासाठी महत्त्वाची आहे कारण ती अतिशय अनोखी व्यक्तिरेखा साकारत आहे. या नव्या पात्रात प्रेक्षकांसमोर आल्याचा  मला खरोखर आनंद आहे आणि मला खात्री आहे प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading