Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार

मुंबई :राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी सहा वाजता ट्विट करत आपण राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय. हर हर महादेव चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्य दृश्य असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ठाणे येथे चित्रपट बंद पाडला होता, यावेळी कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना बेदम मारहाण करण्यात आली होती, तसे व्हिडीओ ही व्हायरल झाले होते.याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती , त्यानंतर न्यायालयाने आव्हाड यांना जामीन दिला होता.
काय म्हटलंय आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये 
पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading