उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून गृहखात्याचा गैरवापर – विद्या चव्हाण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. या प्रकरणी आपण कोर्टात जाणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी दिल्या. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहखात्याचा गैरवापर सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खात्याचा कारभार स्वत:कडे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. या प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा गैरवापर सुरू आहे. त्यांच्याकडील गृहखाते मुख्यमंत्र्यांनी आपल्या हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी सायंकाळी माझा विनयभंग केला, असा आरोप भाजपच्या महिला पदाधिका-याने केला आहे. याच आरोपावरून जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
