Friday, August 28, 2026
BusinessLatest News

इंडियन ऑइल ने फेकून दिलेल्या पीईटी बाटल्यांपासून बनवलेले ‘शाश्वत आणि हरित’ युनिफॉर्मचे अनावरण

 

दरवर्षी 2 कोटी बाटल्यांचा पुनर्वापर करणार

पुणे  : इंडियनऑईलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी अनबॉटल्ड – टूवर्ड्स ए ग्रीनर फ्यूचर नावाच्या एका भव्य समारंभात एका विशेष शाश्वत व हरित गणवेशाचे अनावरण केले. हा गणवेश केवळ इंडियनऑईलच्या तीन लाख फ्यूएल स्टेशन अटेंडंट आणि इंडेन एलपीजी गॅस डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेला आहे. या गणवेशांसाठी वस्त्र हे फेकून दिलेल्या व वापरलेल्या पीईटी बाटल्यांपासून काढलेल्या पुनर्वापर करण्यात आलेल्या पॉलिस्टरपासून बनविलेले आहे. या उपक्रमातून ४०५ टन पीईटी बाटल्यांच्या पुनर्वापराला चालना मिळेल. यामुळे वर्षाला २ कोटी बाटल्यांची बचत होईल. प्रसिद्ध अभिनेत्री आणि पर्यावरण कार्यकर्त्या भूमी पेडणेकर याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना एस. एम. वैद्य म्हणाले, “हे पर्यावरणाला अनुकूल आमच्या हरित कटिबद्धतेचे उदाहरण म्हणून झळाळून उठतील. आमचे आघाडीवरील ऊर्जा सैनिक हे गणवेश घालतील, याचा मला आनंद आहे. दरवर्षी ८० लाख मेट्रिक टन प्लॅस्टिक महासागरांमध्ये प्रवेश करते आणि सुमारे १५ कोटी मेट्रिक टन प्लॅस्टिक आपल्या सागरी परिसंस्थांमध्ये फिरत राहते. या गतीने २०५० पर्यंत समुद्रांमध्ये माशांपेक्षा जास्त प्लॅस्टिकच असेल. प्लॅस्टिक बाटल्यांचे कपड्यांमध्ये रूपांतर करणे हे एखाद्या समस्येवर साततत्याने कार्य केले तर नव्या संधींचे दरवाजे कसे उघडतात, याचे उत्तम उदाहरण होय.”  वैद्य यांनी भारतीय एकशिंगी गेंड्यांच्या रक्षणासाठी मोहीम राबवणे आणि सात दशकांपूर्वी नामशेष झालेल्या चित्यांच्या भारतीय जंगलातील पुनर्स्थापना यांसारख्या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना इंडियनऑईलने दिलेल्या आधारांचीही माहिती दिली. तसेच २०२६ पर्यंत नेट झिरोचे लक्ष्य गाठण्याबाबत इंडियनऑईलच्या कटिबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

इंडियनऑईलच्या हरित उपक्रमांचे कौतुक करताना प्रसिद्ध अभिनेत्री आणि पर्यावरण कार्यकर्त्या भूूमी पेडणेकर म्हणाल्या, जीवनशैलीच्या स्वरूपात शाश्वततेचा अंगीकार करून आपण सर्वजण महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. देशाची आघाडीची ऊर्जा कंपनी अशा प्रकारचा पर्यावरणीय प्रयत्न हाती घेत आहे, याचा देशाची एक नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो. इंडियनऑईलला माझ्या शुभेच्छा आणि आभार वातावरण बदलाच्या मुद्द्याची पाठराखण करणाऱ्या भूमीने क्लायमेट वॉरियर्स या देशव्यापी मोहिमेचीही सुरूवात केली आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि लोकांना हरित जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रेरित करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

इंडियनऑईलच्या हरित उपक्रमांतर्गत, वापरलेल्या प्लॅस्टिक बाटल्या छोट्या चकत्यांच्या रूपात तोडल्या जातात आणि मायक्रो-पेलेट्सच्या स्वरूपात वितळविण्यात येतात. या हरित वस्त्रांचे विणकाम करण्यासाठी मायक्रो-पेलेट्सचे रूपांतर धाग्यांमध्ये करण्यात येते. या वस्त्राचा पर्यावरणावरील परिणाम फक्त रिसायकलिंगच्या लाभांच्याही पलीकडे असतो. हे कपडे दर्जाच्या संदर्भात विर्जिन पॉलिस्टरच्या बरोबर असतात, मात्र त्यांच्या निर्मितीसाठी लक्षणीय प्रमाणात कमी संसाधने वापरली जातात. त्यांच्या निर्मितीत जवळपास ६० टक्के कमी ऊर्जा लागते, आणि विर्जिन पॉलिस्टरच्या तुलनेत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन एक तृतीयांश कमी होते. हे कपडे झिजल्यानंतरसुद्धा वापरलेल्या पॉलिकॉटन गणवेशांचे यांत्रिकरीत्या पुनर्वापर करून त्यांचे रूपांतर स्वस्त गोधडी, ब्लँकेट किंवा उंची डेनिम फॅब्रिकमध्ये केले जाऊ शकते. हे वस्त्र जागतिक पुनर्वापर प्रमाण प्रमाणपत्रांनुसार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading