सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सत्तासंघर्षात ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून एक नवा डाव टाकण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील आणि ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनाही शिंदे गटात प्रवेश केला.
मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे. किर्तीकर यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला असतानाच, रविवारी शिंदे गटाने रविवारी ठाण्यातील टेंभीनाका येथील आंनद मठात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन ठाकरे गटाला पुन्हा धक्का दिला आहे.
