पोलीस सहआयुक्त संदीप कर्णीक यांचा पर्वती ते तळजाई माॅर्निंग वाॅक……..
पुणे :शहरातील ऐतिहासिक पर्वती वर पुणेकर सकाळी व्यायामासाठी येत असतात…काही लोक पर्वती वरुन तळजाई ला जात असतात. पुण्याच्या मध्यभागी निसर्गाने नटलेला ह्या भागाचं आकर्षण सगळ्यांनाच आहे……
बंदोबस्ताच्या अनुषंगाने गणेश विसर्जन मिरवणूक रात्रभर समाधान चौकात थांबून पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूकीचा अनुभव , किंवा नवरात्रोत्सवात ऐतिहासिक देवीच्या मंदिरांना दर्शनासाठी भेट असो…..
पुण्याच्या संस्कृतीची ओळख जाणून तो अनुभव घेण्याचा प्रयत्न पुण्याचे पोलीस सहआयुक्त मा संदीप कर्णीक साहेब करत आहे …..कार्यकर्ते,नागरीक यांच्याशी समन्वय राहिला तर प्रत्येक अडचण समजून त्यावर उपाययोजना करता येईल ..त्यामुळे पुण्याची सांस्कृतिक परंपरा टिकवून अधिक चांगल्या प्रकारे नागरिकांना त्याचा आनंद मिळेल….पोलीस प्रशासनाची नागरीका प्रती असणारी प्रतीमा उंचावण्यास मदत होईल…..आणि नागरिकांचे सहकार्य पण पोलीस प्रशासनास मिळेल…..अशा भावनेतून पोलीसांनी नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमवेत रविवार सुटीच्या दिवशी पर्वती ते तळजाई माॅर्निंग वाॅक आयोजित केला होता……
स्वतः पोलीस सहआयुक्त मा संदीप कर्णीक साहेब आघाडीवर राहून सगळ्यांशी संवाद साधत होते…..आपल्या अधिकारी वर्गाशी तर आपुलकीने बोलत होतेच पण तसेच तळजाई वर पोलीस ट्रेनिंग घेणाऱ्या तरुणाईला मार्गदर्शन करत होते…..रोज फिरायला येणाऱ्या कडून तळजाई विषयी माहिती पण घेत होते……महिला अधिकारी यांची विचारपूस करुन पुढच्या वेळी महिला अधिकारी मोठ्या संख्येने घेऊन येण्याच्या सुचना केल्या……
बजाज अलायन्ज च्या मॅरथाॅन स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन पण त्यांनी केले
तळजाई मातेचं दर्शन करुन पुणेकरांची आवडती मिसळ वर ताव मारुन माॅर्निंग वाॅक संपला…..
सदर माॅर्निंग वाॅक मध्ये पोलीस उपायुक्त संदिप सिंग गिल,
सहाय्यक पोलीस आयुक्त मा.गलांडे,
दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा अभय महाजन,सहकार नगर पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा.सावळाराम साळगावकर, अविनाश धुमकर, राजाभाऊ कदम,नितीन पंडित, अॅड प्रताप परदेशी ,शिरीष मोहीते,कुमार रेणूसे, महेश डाबी, प्रशांत थोपटे, अमोल शुक्ल, गौरव कदम,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते…
