Thursday, August 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संजय राऊत हे तुरुंगातून सुटून आल्याने शिवसेनेची ताकद दसपटीने वाढली -सुषमा अंधारे

मुंबई:शिवसेनेच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विरोधी पक्ष नेते आंबासाहेब दानवे सुद्धा उपस्थित होते.
सुषमा अंधारे म्हणाल्या,संजय राऊत हे गुरूतुल्य व्यक्तीमत्व आहेत संजय राऊत हे तुरुंगातून सुटून आल्याने शिवसेनेची ताकद दसपटीने वाढली आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत हे आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना भेटण्याची उत्सुकता फार होती.बऱ्याच दिवसानंतर मनमोकळ्या गप्पा झाल्या तब्बल 102 दिवस मला पक्षात येऊन झालेत आणि तब्बल सुषमा अंधारे म्हणाल्या,102 दिवसांनी सन्माननीय राऊत साहेब हे आमच्या सगळ्यांना भेटीसाठी उपलब्ध झालेत हा एक योगायोगच म्हणावा परंतु एक नक्की राऊत साहेबांच्या येण्याने खूप ताण कमी झाल्यासारखा वाटत आहे थोडेसे हलके वाटत आहे आणि सोबतच शिवसेनेची ताकद दहा पटीने वाढली आहे.
राऊत साहेबांना म्हटलं , सर आम्ही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला आमच्या आमच्या परीने खिंड लढवली फार मोठे काही नाही केलं रावसाहेब उत्तरले हे तुम्ही निकराने लढलात ही खिंड देखील म्हणजेच ती पावनखिंड झाली.. माझ्या सारख्या एका छोट्या शिवसैनिकांसाठी ही फार मोठी पोच आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
लांब पल्ल्याची तोफ असं संजय राऊत यांचं वर्णन उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. विरोधकांवर टीका करताना काय केलं पाहिजे हे मी समजून घेतलं. संजय राऊत परत आल्यानंतर शिवसेनेची उमेद वाढली आहे. ईडीने जी सुडबुद्धीने कारवाई केली त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढलेच. ईडीची खरंच गरज आहे का? यावर चर्चा होण्याची गरज आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या,देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद, गृहमंत्रीपद, इतर खाती हे सगळं सांभाळत असताना देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होते आहे. त्यांनी गृह खातं दुसऱ्या कुणाला तरी सोपवलं पाहिजे. सुप्रिया सुळेंचा अपमान केला जातो, संभाजी भिडे महिला पत्रकाराचा अपमान करतात तरीही गृहमंत्री काहीच बोलत नाहीत मग हे खातं त्यांना झेपतं आहे का? असाही प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading