Thursday, May 28, 2026
BusinessLatest NewsMAHARASHTRA

फिक्की महिला आघाडी मोठ्या प्रमाणात महिला उद्योजिका निर्माण करणार – नीलम सेवलेकर

साईबाबा चरणी शिर्डी येथे फिक्की महिला पदाधिकाऱ्यांचा संकल्प –
शिर्डी — महिला या उद्योग क्षेत्रात यशस्वी झाल्या पाहिजे ,त्यासाठी फिक्की ही महिला उद्योजिका साठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने त्यांना विविध प्रकारे सहाय्य करून उद्योग आणि व्यवसायाचे धडे दिले जाणार असून येत्या वर्षभरात मोठ्या प्रमाणत महिला उद्योजिका निर्माण करण्याचा संकल्प फिक्की पुणे विभागाच्या अध्यक्षा निलम सेवलेकर यांनी व्यक्त केला .नुकतीच पुण्यात फिक्की महिला
आघाडीची देशव्यापी परिषद पार पडली त्यानिमित्त देशभरातील महिला उद्योजिका आल्या होत्या .परिषद झाल्यानंतर सर्व महिला उद्योजिका शिर्डी येथे साई दर्शनासाठी आल्या होत्या .
श्री शिर्डी साई संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बा(IAS) यांनी पुणे विभाग अध्यक्षा नीलम सेवलेकर व राष्ट्रीय अध्यक्षा जयंती दालमिया यांचे स्वागत केले .व फिक्की संस्था महिलांसाठी करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले .
यावेळी फिक्की महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा जयंती दालमिया ,पुणे विभाग अध्यक्षा निलिमा सेवलेकर,सोनिया राव यासह महाराष्ट्र आणि देशभरातील महिला उद्योजिका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading