Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिर्डीच्या शिबिरानंतर मी कुठे गायब होतो अजित पवारांनी सांगितली कहानी

पुणे :शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते. मात्र, अजित पवार हे अनुपस्थित असल्याने मोठी चर्चा सुरू झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या अपशब्दांनंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काहीही भाष्य न केल्याने त्यांच्या नाराजीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. पण आज त्यांनी आपला नियोजित करा चालू केला. अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तेव्हा त्यांनी पत्रकारांशी फक्त दोन मिनिटे संवाद साधला.
. अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाच दिवस कुठे होतो‌ याचा उलगडा केला आहे. अजित पवार म्हणाले की, पाच दिवस आजारी होतो. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत त्यांनी चर्चांना पूर्ण विराम लावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading