Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

अखेर ABVP च्या दबावापुढे MIT-WPU युनिव्हर्सिटी प्रशासन झुकले……..

पुणे:MIT-WPU युनिव्हर्सिटी येथे ज्या विद्यार्थ्यांनी लेट फिस भरली होती. अशा विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटी प्रशासनाने 10 टक्के पेनल्टी व दिवसाला 500 ते 1000 रुपये दंड आकारला होता. यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक व आर्थिक छळ होत होता. या अन्यायकारी धोरणाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ” भिक मांगो आंदोलन” अशा प्रतीकात्मक स्वरूपाचे आंदोलन केले… त्यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाचे रजिस्टार प्रशांत दवे सर यांनी ज्या विद्यार्थ्यांवर पेनल्टी लागली आहे त्या विद्यार्थ्यांची पेनल्टी मागे घेण्याचे ठरवले आहे.
विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होऊन देणार नाही आणि जिथे असे प्रकार घडतील त्या ठिकाणी अभाविप विद्यार्थ्यांसोबत उभा राहील अशी ग्वाही अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी विद्यार्थ्यांना दिली.

पुढीलप्रमाणे मागण्या मान्य झाल्या.
१. सर्व प्रकारची पेनल्टी रद्द केली
२.ज्यांनी पेनल्टी भरली त्यांचे पैसे परत देणार
३.उर्वरित फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 15 दिवसाचा कालावधी (ज्यांना शक्य नसेल त्यांनी अर्ज करून मुदत वाढवून घेऊ शकतात)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading