Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संजय राऊत आता बाहेर आले आहेत त्यामुळे ते पूर्ण ताकदीने कामाला लागतील – खासदार सुप्रिया सुळे

पुणे: शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणातून विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.त्यावरमाजी गृहमंत्री अनिल देशमुख नवाब मलिक आणि संजय राऊत यांना विविध कारणासाठी अटक करण्यात आली होती. पण त्यांना आता न्याय मिळत आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. हे सर्व लढवय्ये नेते आहेत. संघर्ष हा प्रत्येकाला आयुष्यात करावा लागतो. पण आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आणि तो आज सार्थ झाला. आम्ही न्यायदेवतेचे आभार मानतो. ते आता बाहेर आले आहेत. त्यामुळे ते पूर्ण ताकदीने कामाला लागतील, असा आम्हाला विश्वास आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वात जास्त आरोप कोणत्या कुटुंबावर झाले असतील, तर ते आमच्या कुटुंबावर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर झाले असतील. त्यामुळे आम्हाला किती त्रास झाला असेल, पण आम्ही कधी काही बोललो नाही. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हर महादेव’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावर प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या, मला जे काही कळत आहे, ते तुमच्या माध्यमातून कळते आहे. पण मला असे वाटते इतिहासाची मोडतोड योग्य नाही. शिवाजी महाराजांबद्दल जर कोणी चुकीचे दाखवत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे संभाजी महाराज जो विरोध करत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भारत जोडो यात्रेत मी स्वतः हा जयंत पाटील , जितेंद्र आव्हाड आणि मी स्वत: भारत जोडो यात्रेत
सहभागी होणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवीगाळ केली तरी अजित पवारांनी साधं ट्वीट देखील न केल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला बघायला मिळतोय. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतल्या शिबिरापासून अजित पवार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,प्रत्येकाला त्याचे एक पर्सनल आयुष्य असते, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या चर्चेवर पडदा टाकला. याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अजित पवार त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते नॉट रिचेबल असू शकतात. म्हणून याचा अर्थ काही राजकीय असेल असे होऊ शकत नाही. असे मत सुळे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading