Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील आगामी ग्रामपंचायत निवडणूका संभाजी ब्रिगेड पुर्ण ताकतीने लढवणार

पुणे : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील डिसेंम्बर महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने लढवणार आहे, पेरणे ग्रामपंचायत निवडणूक डिसेंम्बर महिन्यात होणार आहे वार्ड नंबर ३ आणि वार्ड नंबर ४ ह्या दोन्ही वार्ड मध्ये संभाजी ब्रिगेड उमेदवार देणार आहे, आणि त्यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी माहिती दिली, पेरणे ग्रामपंचायत च्या वार्ड क्रमांक ३ आणि वार्ड क्रमांक ४ मध्ये कचऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न आहे, संभाजी ब्रिगेड चे उमेदवार निवडून आल्यानंतर दोन्ही वार्डातील प्रश्न संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोडवणार आहोत, आधी विजय स्तंभ समोर असणाऱ्या वाघमारे वस्तीवर राहणाऱ्या लोकांना कचऱ्याचा होणाऱ्या त्रासा पासुन बाहेर काढणार आहोत, ३ आणि ४ मधील वार्डातील जनतेला पिण्यासाठी फिल्टरचे पाणी देणार आहोत, अनेक प्रश्न आहेत ते संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातुन आम्ही मार्गी लावणार आहोत, असेही घाडगे यांनी संगितले,शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ खेड, जुन्नर, मावळ तालुक्यातीलही ग्रामपंचायत संभाजी ब्रिगेड त्या भागातील तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पूर्ण ताकतीने निवडणुका लढवणार आहे, तशा सुचना त्यांना दिलेल्या आहेत, डिसेंम्बर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत पेरणे ग्रामपंचायत वार्ड ३ आणि ४ मधील सर्वच्या सर्व तसेच इतर तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडणून येतील असा विश्वास संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी वेक्त केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading