Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बनले भारताचे ५० वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून औपचारिकपणे शपथ घेतली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना राष्ट्रपती भवनात न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्यानंतर भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी उपस्थित होते.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी निवृत्त सरन्यायाधीश यूयू लळीत यांची जागा घेतली आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading