Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

मराठी माथाडी कामगारांवर अन्याय जर होत असेल तर याद राखा…निलेश माझिरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा…

पुणे :-माथाडी कामगारांचे तीन वर्षापासून एका गोडाऊनने पेमेंट थांबवले माथाडी बोर्डाला वारंवार पत्रव्यवहार करून पण उत्तर भेटत नाहीये.माथाडी कामगारांना पगार मिळत नाहीये.याबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांनी माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना मनसे स्टाईल ने इशारा दिला आहे.

माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना माझा हा इशारा आहे तुम्ही ज्या खुर्चीवर बसताना ते कामगारांना न्याय देण्यासाठी कंपनीच्या मालकाशी सेटलमेंट करायला बसवलं नाहीये तुम्हाला एक जरी विषय माझ्या कानावर आला तर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एवढे लक्षात ठेवा.आमच्या अंगावर 11 गुन्हे दाखल आहे.गुन्हे दाखल व्हायला आम्ही घाबरत नाही.जर मराठी माथाडी कामगारांच्या वर अन्याय होत असेल तर याद राखा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बारीक लक्ष तुमच्याकडे कडे आहे.असा इशारा यावेळी  महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनाचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांनी दिला आहे.

आज माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याअगोदर  मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला त्यांना बोलावण्यात आले पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी निलेश माझिरे यांना असे सांगण्यात आले की तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या.अश्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading