Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड – छत्रपती सांभाजीराजे

पुणे : मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीची चढाओढ लागली आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर चित्रपट येत आहेत. मात्र नुकताच आलेला हरहर महादेव आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावर सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का? इतिहासाचा विपर्यास होऊ देणार नाही. लोकांनी असे चित्रपट बघू नये, आपण सेन्सॉर बोर्डाला पत्र देणार असल्याचे संभाजीराजे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.

या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते. संभाजी राजे म्हणाले, इतिहासाचा विपर्यास करणारे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. माझी सूचना आहे की तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट काढायचे आहे तर त्यासाठी ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे.अशी मागणीही संभाजी राजे यांनी केली.

चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत. भालजी पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? वेडात मराठे वीर दौडले सात काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी महेश मांजरेकर यांचे पुत्र सत्या मांजरेकर याचा फोटो दाखवून उपस्थित केला. या चित्रपटात कुठल्या दृष्टीने हा मावळा वाटतो. असं संभाजी राजे म्हणाले. तसेच शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही करू शकतो. अक्षय कुमार असो किंवा दुसरा कुठलाही अभिनेता. असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading