Saturday, October 24, 2026
BusinessLatest News

वनस्पती-आधारित मांस उत्पादनांची श्रेणी लॉन्च

पुणे : वनस्पती-आधारित मांसाची लोकप्रियता जागतिक स्तरावर तसेच भारतातही वाढत आहे. उद्योग संशोधन व विकास क्षमतेवर आधारित कॉन्टिनण्टल कॉफी (सीसीएल) या स्वदेशी कॉफी ब्रॅण्डने भारतात आपला वनस्पती-आधारित ब्रॅण्ड ‘कॉन्टिनण्टल ग्रीनबर्ड’ लॉन्च केला आहे. कॉन्टिनण्टल ग्रीनबर्ड ग्राहकांना मांसाची चव न गमावता जगभरात टिकाऊ असलेल्या निवडी करण्यास सक्षम करते.
वनस्पती-आधारित मांस हे देखील नियमित मांसापेक्षा आरोग्यदायी असते, कारण ते कोलेस्टेरॉल आणि ट्रान्स-फॅटपासून मुक्त आहेत आणि नॉन-जीएमओ (जनुकीय सुधारित जीव) आहेत.

कॉन्टिनण्टल ग्रीनबर्डसह सीसीएल सुरूवातीला चार वनस्पती-आधारित मांस प्रकार सादर केले. चिकन-लाइक नगेट्स, चिकन-लाइक सीख कबाब, चिकन-लाइक सॉसेज व मटन-लाइक कीमा. त्यांची सर्व उत्पादने वनस्पती-आधारित प्रथिनांपासून बनवण्यात येतात, जी हिरवे वाटाणे, चणे यापासून आणि कीमाच्या बाबतीत सोयापासून घेण्यात आली आहेत. हे वास्तविक मांसासारखी चव व पोत निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे आणि उत्तम स्वाद देखील कायम राखते. कॉन्टिनण्टल ग्रीनबर्डसह सीसीएल आता ग्राहकांसाठी प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही क्रूरता न करता मांसचा तोच स्वाद, फील व पोत देईल.

ही प्रथिनयुक्त वनस्पती-आधारित उत्पादने मांसाहारी ग्राहकांसाठी योग्य आहेत, ज्यांना मांसाची चव आणि पोत न सोडता निरोगी आहाराची निवड करायची आहे. हे शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम ऑफर देखील आहे, जे त्यांचे प्रथिन आणि फायबरचे सेवन वाढवण्याचे पर्याय शोधत आहेत. ही उत्पादने अशा ग्राहकांसाठी देखील योग्य आहेत, ज्यांचे मांस सेवन धार्मिक कारणांमुळे प्रतिबंधित आहे. ज्यामुळे त्यांना चवीशी कोणतीही तडजोड न करता गिल्ट-फ्री स्नॅकिंगची संपूर्ण नवीन संधी मिळते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading