Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

लव्ह जिहादसारख्या विषयाच्या माध्यमातून समाजामध्ये वाद वाढवणे दुर्दैवी – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे:कोल्हापूर मध्ये पुन्हा एकदा. लव्ह जिहाद विषय समोर आला आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील काही मान्यवरांनी याबाबत आवाज उठवला होता.
१८ वर्षा च्या आतील मुलींना त्यांच्या विवाहाचा निर्णय घेण्यात काही बंधने आहेत. मात्र एखाद्या मुलीला जर कोणी फुस लावून अथवा फसवणूक करून लग्नासाठी जबरदस्ती करीत असेल तर त्यासंदर्भात अनेक कायदे आपल्याकडे आहेत. एखाद्या मुलीचा जोपर्यंत रीतसर जबाब लिहून घेतला जात नाही, तसेच याबाबत खरंच तिच्यावर काही जबरदस्ती झाली असल्याचे निदर्शनास येत नाही, तोवरच लव्ह जिहाद आहे आणि याबाबत आम्ही कायदे करण्यासाठी पुढाकार घेत आहोत असे म्हणणे केवळ चुकीचे आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक मुलींची अपहरण झाल्याचे प्रकार झाले आहेत पण यामागे धर्मांतराच्या नावाखाली किंवा धर्मांतराच्या कायद्याचा प्रभाव म्हणूनच हे झाले की काय याबद्दल अभ्यास करणे गरजेचे आहे. याबद्दलची वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे पाहणे आवश्यक आहे अन्यथा या परिस्थितीचा फायदा घेऊन समाजामध्ये तेढ वाढवण्याचा प्रयोग आणि प्रयत्न काही विघातक शक्ती करत असतात. म्हणून पॉक्सो सारख्या कायद्याची अंमलबजावणी अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि अपहरणा नंतर त्या पुन्हा घरी परतल्यानंतर त्यांची काय परिस्थिती आहे याबद्दलचा अभ्यास आणि अवलोकन करण्याची आवश्यकता आहे. विवाहाच्या बाबतीत बोलायचे ठरले तर याबाबतचा निर्णय घेणाऱ्या दोन्हीही व्यक्ती जर सज्ञान असतील तर त्यांना असा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. पण या विषयावर काही ना काही माध्यमातून समाजामध्ये वाद वाढवणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading