Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस

पुणे : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात महिला पत्रकाराला तू कपाळावर कुंकू लावला नाही टिकली लावली नाही म्हणून तिला अपमानित केले या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोग वतीने घेण्यात आली आहे आणि नियमानुसार संभाजी भिडे यांना त्वरित नोटीस पाठवलेली आहे.

महिला अधिकाराच्या चळवळीतील महिला अभ्यासक आणि नेत्या यांनी टीकेची झोड उठवलेली आहे.पत्रकाराला दस्तूर खुद्द वादग्रस्त आणि आरोपी असलेल्या संभाजी भिडे यांनी असे बोलणे हे अपमानास्पद असल्याची टीका राज्यातील समस्त महिला हक्काच्या चळवळीतील नेत्यांनी केलेली आहे. तसेच, राज्य महिला आयोगाच्या वतीने अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील तातडीने संभाजी भिडे यांना नोटीस पाठवलेली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(२) (क) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या आधारे संभाजी भिडे यांना ही नोटीस पाठवलेली आहे.
स्त्री हक्काच्या चळवळीतील कार्यकर्ता ज्योती साठे , वर्षा विद्या विलास कुंदा प्रमिला निळकंठ , ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश सावंत सिताराम शेलार अशा अनेक पुरुष महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचे हे वागणे स्त्री पुरुष समानतेला पायदळी तुडवण्यासारखे आहे .राज्यघटनेच्या समानता या मूल्यांचा हा अवमान आहे.
तसेच सार्वजनिक रित्या अशी कृती करणे ही कुठल्याही महिलेला अपमान स्पर्धच आहे प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे कोणत्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचा पेराव करावा काय पद्धतीने रहावे हे राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा संकोच करण्यासारखे आहे. असे त्यांनी म्हटलेले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading