शिंदे व फडणवीस सरकार टिकेल याची शक्यता नाही – पृथ्वीराज चव्हाण
पुणे: राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झालेला नाही. अजूनही अनेक जणांना मंत्रीपद भेटले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे.
बरेच जण 10 दिवसांसाठी मंत्री व्हायला तयार नाहीत. तसेच सरकार राहील का याचीच शक्यता नाही. या शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे सरकारवर पुण्यातील पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे उपस्थित होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
राज्यातील तीन प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यामुळे विरोधक शिंदे व फडणीस सरकारवर टीका करत आहेत.राज्यात राजकीय अनिश्चितता आहे का हे गुंतवणुकदार बारकाईने पहात असतात. सध्याचे सरकार मागचे निर्णय बदलत आहे.जिथे शाश्वती नाही, तिथे गुंतवणूकदार थांबत नाही. तसेच केवळ खाजगीच नाही तर सरकारी गुंतवणूक ही मुंबईतून पळवली जाईल, तेव्हा फडणवीस चकार शब्दही बोलले नाहीत.अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
राज्यात मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील नाशिक भागातील व आणि काय भागातील शेतीचे नुकसान झाले आहे .त्यामुळे शेतकरी शेतीचे नुकसान झाले आहे . त्याची भरपाई आम्हाला भेटावी अशी मागणी करत आहेत. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,राज्यात पोलीस भरती जाहीर केली होती. मात्र, ती परत रद्द केली. यामुळे सरकारची किती अप्रितष्ठा होते. उद्योग जाताहेत. मला त्यांच्या अंतर्गत भांडणात पडायचं नाही. ते आता जोरात सुरू झालेय. कुणी कुठेही जा, फिरा पण लोकांच्या कामांची जबाबदारी पार पाडा, असे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधींची भारत जोड यात्रा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे.राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे नियोजन स्पष्ट करताहेत.देगलूरला त्यांचे स्वागत होईल. पुण्याच्या संघटनात्मक तीन जिल्ह्यातून लोक बुलढाणा इथे सहभागी होतील. इतिहासांत एवढा मोठा राजकीय पदयात्रेचा कार्यक्रम झालेला नाही. तसेच भारत जोडो यात्रेचा रूट कसा ठरवला हे माहित नाही. असे चव्हाण म्हणाले.
