Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी दीपोत्सव सोहळा साजरा

पुणे:स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्याच्या व विदूत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
या वेळी प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक मारुती पाटील, गुंफा इंगळे (तुळापूर सरपंच), मिना सातव पाटील, सुषमा आव्हाळे, ग्रा.पं. सदस्य सुरेखा शिवले, अलका सोनवणे, बाळासाहेब सातव, गणेश कुटे – भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव, पांडुरंग शिवले, नवनाथ शिवले, ॲड. संजय सावंत पाटील – जिल्हाध्यक्ष पुणे भाजपा कायदा आघाडी, माजी पंचायत समिती सदस्य श्यामभाऊ गावडे हे उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन कामिनीताई शरद ताकवले व ऋषीकेश ताकवले यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सरपंच संतोष शिवले यांनी केले तर प्रस्ताविक व्याख्याती रेश्मा तांबे यांनी केले. ज्योती सातव यांनी इतिहास आपल्या वाणीतून सर्वांच्या नजरे समोर उभारला.

ॲड संजय सावंत पाटील यांनी संबोधन करत असताना असे दिवाळी दिपोत्सव महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांच्या समाधी स्थळी घेऊन महापुरुषांचे विचार समाजापर्यत पोहोचवणे गरजेचे आहे यामुळे एक नविन प्रेरणा युवकांना मिळेल, तसेच व्यासपीठावर राजकीय मान्यवर उपस्थित असल्यामुळे आपल्या विभागातील वाढती वहानांची संख्या पाहून प्रत्येक राजकीय नेत्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत असे आपल्या भाषणाव्दारे विनंती व्यक्त केली.

सर्वच प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यश तांबे व प्रांजली खुळे यांनी उगवत्या शैलीत राजांचा इतिहास सांगितलं यावेळी उपस्थित पोलीस बांधव – रितेश काळे, कुणाल सरडे, उद्योजक राजू ताकवले, मनीषा ताकवले, शालिनी ताकवले, मोनिका सातव, नेहा देशमुख, मनीषा पवार, श्रुती मोरे आणि शिवपुत्र विकास प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading