Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

“हर मर्द को दर्द होता है, और में वो छुपाने वाला मर्द नही हूं” – अक्षय !

आज घरात अमृता धोंगडे, अक्षय आणि समृद्धी योगेशबद्दल बोलताना दिसणार आहेत. नक्की अमृता आणि अक्षयला योगेशचा राग का आलाय ? त्याचं कारणं आज कळेलच पण अक्षय त्याबाबत अमृता आणि समृद्धीशी चर्चा करताना दिसणार आहे. अक्षय सांगताना दिसणार आहे, तुम्हांला माहिती आहे मला तो काल काय म्हणाला ? तू खरंच रडूबाई आहेस रे, नाटक करतोस. नाटक करायचं असतं तर मी काल आई बाबांचा फोटो घेऊन रडत बसलो असतो drama संपल्यानंतर. हर मर्द को दर्द होता है, और में वो छुपाने वाला मर्द नही हूं! समृद्धीचे म्हणणे आहे, तो चांगला माणूस आहे, त्याचा पण struggle आहे. अक्षय म्हणाला, पण असं म्हणणं चुकीचे आहे ना ? अमृता म्हणाली, आम्ही तिघे जरी बसलो असू ना तरी तो म्हणे तू beautiful आहेस, तू हॉटच आहेस मग तिला सारखं बोलत बसायचं. मी काय बावळट आहे का? ती सगळ्यांपेक्षा उजवी आहे असेल तिचा स्वभाव आहे चांगला… मला देखील मान्य आहे मी मैत्रीण आहे तिची. पण हे काय आहे दरवेळेस. मला म्हणे हीचा स्वभाव चांगला आहे तुझं बोलणं चांगलं नाही. मी म्हंटलं माझं बोलणं असंच आहे. मी तोंडावर बोलते जे काही असेल ते मला नाही जमंत… “

आता पूढे यांच्यामध्ये अजून काय चर्चा झाली ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. बघूया पुढे काय होईल ते आजच्या भागात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading