विनायक निम्हण यांच्या कुटुंबियांचे अजित पवार यांनी केले सांत्वन
पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रीय व सामाजिक वर्तुळाची हाणि झाली आहे.काल युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विनायक निम्हण यांच्या कुटुंबांचे सातवण करून त्यांची विचारपूस केली आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायक निम्हण यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले आहे.
यावेळी त्यांच्याबरोबर अंकुश काकडे ,शहराध्यक्ष प्रशांत जगताप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
