40 लोकांचा ओला दुष्काळ 50 खोक्यांनी मिटला असेल आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला टोला
पुणे:राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झालाय. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेलं पीक दिवाळीच्या तोंडावर हिरावून घेतलं.त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. कृषिमंत्री म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी परिस्थिती नाही. त्यामुळं ओला दुष्काळ म्हणजे काय हे आम्हाला कृषिमंत्र्यांनी सांगावं. 40 लोकांचा ओला दुष्काळ 50 खोक्यांनी मिटला असेल. अशी लोकांमध्ये चर्चा आहे.असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळा जाहीर करावा.अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी नाशिक सकट शिक्रापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला .
आदित्य ठाकरे म्हणाले,मात्र तसं काही होतंय असं चित्र तरी नाहीये.
आत्महत्या करु नका, धीर धरा, असा सल्लाही आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
तसेच ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी अजूनही बांधावरील दौरे सुरू न केल्याची टीका केली. तसंच अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे का नाही पोहचले, असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल करा असं आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केलं.
मंत्र्यांकडून कुठंही गांभीर्यानं घेतलं जात नाही. मंत्री म्हणून ते जेव्हा बांधावर फिरायला येतील, तेव्हा त्यांना याचं गांभीर्य जाणवेल. तेव्हा शेतकरी त्यांना विचारेल. मला मदत म्हणून काय आणलं. हे बघायला नका येऊ हे काही टुरिझम नाही.असे
आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री मंडळांना भेट देतात. गडचिरोलीत पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. पण, अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री दिसत नाही. घाबरले नसते तर सूरत गुवाहाटीला गेले नसते.
मुख्यमंत्र्यांना बांधावर येऊन फिरून जाता येणार नाही. बांधावर येऊन मुख्यमंत्र्यांना मदत जाहीर करावी लागेल.तरचं मुख्यमंत्र्यांनी बांधावर येणं गरजेचं आहे.नाही.असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले.
मी अडीच वर्षांत एकही राजकीय वक्तव्य केलं नाही. आम्ही लोकोपयोगी काम केलीत. कोणती काम प्रस्तावित आहेत. कोणती कामं करायची आहेत.यावरच बोलत होतो.
सरकार घटनाबाह्य असल्याची टीका केली जाते. यासंदर्भात जी केस सुरू आहे ती देशासाठी महत्वाची राहणार आहे. अशा गद्दारीला संविधानिक स्थान दिलात तर ते संविधानाच्या विरोधात जाईल. राज्यात वेगळीचं अंधाधुंदी माजेल.असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टी पाहणीदौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी दारु पिता का? असा प्रश्न विचारला आहे.ग्लास बाजूला ठेवून मदतीला आले तर बरं होईल, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी कृषिमंत्री सत्तार यांच्यावर केली. सरकार कुठंय आणि दरबार कुठंय, असंही ते म्हणाले.
