Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

केदारी कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संपूर्ण सहकार्य करणार : आदित्य ठाकरे

जुन्नर:वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दशरथ केदारी यांच्या घरी आज शिवसेनेचे युवानेते आणि महाराष्ट्राचे मा. पर्यावरण मंत्री ना. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी भेट दिली. या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करीत त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे असल्याचे सांगितले. या कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी सदर कुटुंबीयांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी, ‘सदर कुटुंबीयांना भविष्यात शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मदत केली जाईल. . आणखी काही स्वरूपाची मदत लागल्यास अवश्य केली जाणार आहे’, असे सांगितले.
यावेळी भाऊबीजेच्या निमित्ताने या कुटुंबियांच्या वतीने आदित्यजीना ओवाळण्यात आले.

त्यांच्या समवेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पुणे संपर्कप्रमुख आ. सचिन अहिर होते.

*विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडे शेतकरी महिलांची मत व्यक्त केले की, शेतीमालाला हमीभाव मिळणे आवश्यक आहे
या कुटुंबीयांचे राज्य शासनाकडे पाठविलेले घरकुल, संजय गांधी निराधार योजना आणि इतर प्रस्तावांची माहिती देण्यासाठी यावेळी डॅा. नीलम गोर्हे यांना उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या प्रस्तावांचा पाठपुरावा डॉ. गोऱ्हे येत्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करणार आहेत.

या कुटुंबीयांनी डॉ. गोऱ्हे यांनी सदर घटनेनंतर तात्काळ केलेल्या मदतीचा यावेळी आवर्जून उल्लेख केला.

स्थानिक शिवसेना पदाधिकारी सुरेश भोर, प्रसन्ना डोके, माऊली खंडागळे, ज्योत्स्ना महांबरे, युवती सेना अधिकारी नीलम गावडे आणि शिवसेना कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading