Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

अभिनेत्री मयूरी वाघ एकवीरा आईच्या भूमिकेत

नेहमी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मयूरी वाघ आता पुन्हा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. या वेळी मयूरी वाघ एक वेगळी व्यतिरेखा साकारत आहे, ती म्हणजे एकवीरा आईची व्यक्तिरेखा! नेहमी भक्तांच्या पाठीशी असणारी आई एकवीरा, भक्तांना त्यांचा संकटातून कशी तारून नेईल, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ हे या नव्या मालिकेचे नाव असून सोनी मराठी वाहिनी ही मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांचा भेटीला आला असून त्यात  एकवीरा आईच्या वेषातील मयूरी वाघ प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे.

सोनी मराठी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयूरी वाघ आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मयूरीव्यतिरिक्त या मालिकेत अमृता पवारही  छोट्या पडद्यावर परत दिसणार आहे. संकटातून भक्तांना तारण्यासाठी येते आहे एकवीरा आई!  नवी मालिका – ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’! लवकरच… सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading