Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन


पुणे:माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.
पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून 1999 साली ते आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. विनायक निम्हण यांनी दोन वेळा शिवसेनेकडून आणि 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.
माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
त्यावेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता.
2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते.
यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पाषाण स्मशानभूमीत रात्री नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading