Saturday, August 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत म्हणून गोविंद बागेत बॅनरबाजी


पुणे : दिवाळीनिमित्त पवार कुटुंबीयांना भेटून शुभेच्छा देण्याकरिता राज्यभरातून नागरिक बारामतीतील गोविंद बागेत पाडव्याच्या दिवशी येत असतात.
दोन वर्षानंतर गोविंद बागेत पाडवा साजरा होत आहे. पवार कुटुंबियांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे उपस्थित होते. परंतु, अख्या कार्यक्रमात चर्चा फक्त अजित पवारांची होती. कारण मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत म्हणून एका कार्यकर्त्याने गोविंद बागेत बॅनरबाजी केली.
काटेवाडीच्या बाळू जनार्दन भिसे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने हातात भावी मुख्यमंत्री अजित पवार असा मजकूर असलेला बॅनर हातात घेऊन गोविंदबागेत आला होता. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. स्वतः अजित पवार यांनीही बॅनरवाल्या कार्यकर्त्यांला हासून दाद दिली व बॅनर छान केल्याचे सांगत दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे बाळू भिसे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading