Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आम्ही संस्कृती पाळली .तर उलट्या बोंबा सुरु आहेत-चंद्रशेखर बावनकुळे

माझं उद्दव यांना चॅलेंज आहे. पुढच्या 2024 च्या निवडणुकीत तुम्हाला काय घडेल ते दिसेल -चंद्रशेखर बावनकुळे
पुणे: अंधेरी पोट सभा निवडणुकीत भाजपने माघार घेतली.तरि उद्धव ठाकरे यांनी तोंडावर आपटण्यापेक्षा पळालेले बरं पळाले. मग माझं चिन्ह गोठवण्याची घाई का? निवडणूक आयोगाकडे गेले व या बोटावरची थुंकी त्या बोटावर, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप- केली आहे. त्यावर संस्कृती पाळली .तर उलट्या बोंबा सुरु आहेत. माझं उद्दव यांना चॅलेंज आहे. पुढच्या 2024 च्या निवडणुकीत तुम्हाला काय घडेल ते दिसेल.अशी टीका भाजपचे परिषदेचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे.

धर्मांतरामुळे हिंदूंची संख्या कमी होतेय. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक देशांमध्ये विभाजनाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलंय. त्यावरप्रलोभन दाखवून धर्मांतर जे होत आहे. त्या बाबत कडक कायदा झाला पाहीजे . असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमात राहुल देशपांडे यांचं गाणं सुरू होतं.कार्यक्रमात टायगर श्रॉफची एंट्री झाल्यानंतर राहुल देशपांडे यांना गाणं थांबवण्यास सांगितलं. यावरूनच सचिन आहिर यांनी आता आरोप केला आहे भाजपने मराठी कलाकारांचा अपमान केला आहे. त्या कार्यक्रमाची माहिती नाही. मला बघाव लागेल काय घडलं. माहिती घेवून कळवतो. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आज फुरसुंगी येथील उड्डाणपुलावर खासदार सुप्रिया सुळे याही या वाहतूक कोंडी मध्ये अडकल्या. त्यांनी आपल्या गाडीतून उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यावर बावनकुळे म्हणाले,त्यांनी अडीच वर्ष काय केलं. सुप्रिया सुळे खासदार म्हणून त्यांची जबाबदारी जास्त. आत्ता तुम्ही गावोगावी फिरत आहेत. फक्त स्टंटबाजी सुरु आहे. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
दिवाळीमध्ये गरजूंसाठी शंभर रुपयांमध्ये राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देणार अशी घोषणा सरकारने केलेली होती. मात्र दिवाळी जवळ आल्यानंतरही अद्यापपर्यंत या वस्तू पुरेशा उपलब्ध झाल्या नसल्याचं समोर आलं आहे.प्रत्येक रेशनच्या दुकानात किट पोहचलेलं आहे. काहीतरी आरोप करायचे म्हणून आरोप सुरु आहेत. असे बावनकुळे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading